
टाकवे बुद्रुक – टाकवे पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार अश्विनी कोंडे असवले यांनी मतदारान पर्यंत पोहण्यात आघाडी घेतली असुन मतदारसंघातील गावोगावी सध्या सुरू असलेल्या काकडा आरती च्या कार्यक्रमांना उपस्थितीत राहु थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत आहेत
यावेळी मंदीरामध्ये दैनंदिन कार्यक्रमांना लागणाऱ्या वस्तू तसेच देणगी देण्यात आहे यावेळी मंदिरात उपस्थितीत असलेल्या वयोवृद्ध महिला,पुरुष यांच्या समवेत आपुलकीचा संवाद साधुन इच्छुक उमेदवार अश्विनी कोंडे सध्या प्रचार करत आहेत
गावोगावीतील नागरिकांना देखील उदंड प्रतिसाद देत आहेत निवडणूक प्रत्यक्षात जाहीर झाल्यानंतर नक्की पुन्हा येऊ असा शब्द दिला जात आहे काही इच्छुक उमेदवार निवडणूक तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षेत आहेत मात्र महायुतीच्या इच्छुक उमेदवार अश्विनी कोंडे (असवले) मात्र प्रचारात आघाडी घेतली असून आगामी निवडणुक काळात त्यांना यांचा मोठा फायदा होणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे.



