सदैव मदतीसाठी धावून येणारा वांऊड गावच्या विकासाचा आश्वासक चेहरा – सोमनाथ राक्षे

मावळ, प्रतिनिधी : मावळ तालुक्यातील वांऊड गावातील युवा नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केलेले सोमनाथ राक्षे हे सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे परिसरात विशेष चर्चेत आहेत. गावातील कोणतीही अडचण असो, नागरिकांच्या सुख-दुःखात तत्परतेने सहभागी होणारे आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर टाकलेला प्रकाशझोत.
सामाजिक कार्यातून लोकांशी दृढ नाते जोडत त्यांनी अनेकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. गावातील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, युवकांना मार्गदर्शन तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग कायम दिसून येतो. त्यामुळे वांऊड ग्रामपंचायतीच्या विकासासाठी एक आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. आमदार सुनील शेळके यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या ते नाणे मावळ विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. पक्षाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, जनसंपर्क अभियान आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सक्रियपणे कार्यरत आहेत.
राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, या विचारावर विश्वास ठेवून सोमनाथ राक्षे यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. युवकांना सकारात्मक दिशा देणे, समाजात एकोप्याचे वातावरण निर्माण करणे आणि विकासाला प्राधान्य देणे, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे.
आजच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने टिकते. जनतेशी सातत्याने संवाद, उपलब्धता आणि विकासासाठीची तळमळ या गुणांमुळे सोमनाथ राक्षे यांच्याकडे वांऊडसह संपूर्ण नाणे मावळ परिसरातील नागरिक आशेने पाहत आहेत. समाजकारण आणि लोकहिताची ही वाटचाल भविष्यातही अशीच कायम राहावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने निरोगी आयुष्य तसेच पुढील वाटचालीसाठी विविध सत्तरातुन शुभेच्छा देत आहे.



