मावळ

ताशा वादन क्षेत्रातील उज्ज्वल कामगिरीला मानाचा मुजरा; कु. मयूर रत्नप्रभा मधुकर गायकवाड यांना ‘ताशासम्राट ज्ञानसागर पुरस्कार २०२६’

Spread the love

मावळ प्रतिनिधी : ताशा वादन क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदान, अथक मेहनत आणि उल्लेखनीय कलासाधनेची दखल घेत कु. मयूर रत्नप्रभा मधुकर गायकवाड यांना ज्ञानसागर फाउंडेशन तर्फे प्रतिष्ठेचा ‘ताशासम्राट ज्ञानसागर पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

ताशा वादनाच्या क्षेत्रात आपल्या दमदार सादरीकरणातून स्वतंत्र ओळख निर्माण करणारे कु. मयूर रत्नप्रभा मधुकर गायकवाड यांनी अनेक वर्षांपासून या कलेची निष्ठेने जोपासना केली आहे. त्यांच्या समर्पित कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

या गौरव सोहळ्यास आमदार मा. सिद्धार्थजी शिरोळे, माजी उपमहापौर मा. परशुरामजी वाडेकर, विरोधी पक्षनेते मा. निलेशजी निकम, मा. सनीजी निम्हण तसेच प्रा. निवेदिताताई एकबोटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर कु. मयूर रत्नप्रभा मधुकर गायकवाड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “कलेच्या या प्रदीर्घ आणि अखंड प्रवासात केलेल्या माझ्या मेहनतीची दखल घेत ‘ताशासम्राट ज्ञानसागर पुरस्कार २०२६’ देऊन मला गौरविण्यात आले, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा सन्मान माझे कुटुंबीय, गुरुजन, सहकारी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना समर्पित आहे. भविष्यातही ताशा वादनाची परंपरा अधिक जोमाने जपत उत्कृष्ट कार्य करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”

या पुरस्कारामुळे कु. मयूर रत्नप्रभा मधुकर गायकवाड यांनी मावळ तालुक्याच्या कला क्षेत्राचा गौरव वाढवला असून, त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button