मावळ

टाकवे बुद्रुकचे प्रसिद्ध दूध व्यवसायिक अशोक (भाऊ) असवले यांचे निधन; परिसरात शोककळा

Spread the love

 

टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी): टाकवे बुद्रुक येथील दूध व्यवसायिक तसेच परिसरात प्रसिद्ध गाडा मालक म्हणून परिचित असलेले स्व.अशोक (भाऊ) बाळासाहेब असवले यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच टाकवे बुद्रुकसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सर्व स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

स्व.अशोक (भाऊ) असवले यांनी अनेक वर्षे दूध व्यवसायाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि सामाजिक जिव्हाळ्यामुळे ते परिसरात लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने टाकवे बुद्रुक गावाने सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

त्यांचा अंत्यविधी आज (मंगळवार) सकाळी १०.०० वाजता बारव विहीर, टाकवे बुद्रुक येथे होणार आहे.

स्व. अशोक (भाऊ) असवले हे शिवसेना (शिंदे गट) उपतालुकाप्रमुख श्री. सोमनाथ कोंडे यांचे सासरे होते. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button