सामाजिक

नाणे ग्रामपंचायतीत संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

Spread the love

नाणे — नाणे ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामाजिक समता, बंधुता व मानवतेचा संदेश देणारे थोर संत श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास गावकामगार तलाठी श्री विजय जुनारे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री नकुल सुतार, माजी उपसरपंच श्री गबळभाऊ म्हाळसकर, युवा कार्यकर्ते श्री बजरंग म्हाळसकर, श्री मुकेश नाणेकर, श्री बाळासाहेब भोंडवे, श्री रघुनाथ आंद्रे, श्री दत्तात्रय कदम, श्री गणपत कदम आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी एकोप्याने, समतेच्या मार्गाने चालावे, हा संदेश उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दिला. कार्यक्रम शांततामय व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button