टाकवे गावच्या वैभवात भर: स्व. संभाजीभाऊ टेमगिरे यांच्या स्मरणार्थ बैलगाडा घाट कमानीचे दिमाखदार लोकार्पण!

टाकवे बुद्रुक: सामाजिक कार्यातील बैलगाडा क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्त्व स्वर्गीय पै.संभाजीभाऊ टेमगिरे यांच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी आणि बैलगाडा शर्यतीच्या परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी टाकवे बुद्रुक येथे उभारण्यात आलेल्या भव्य ‘बैलगाडा घाट कमानी’चा लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक मा. अण्णासाहेब भेगडे यांच्या शुभहस्ते व समस्त ग्रामस्थांच्या साक्षीने हा सोहळा मांगल्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
बैलगाडा शर्यतीची आवड आणि गावाची परंपरा जपण्यासाठी स्व. संभाजीभाऊ टेमगिरे यांचे योगदान अतुलनीय होते. त्यांच्याच स्मरणार्थ ही कमान उभारण्यात आली असून, यामुळे घाटाच्या सौंदर्यात आणि प्रतिष्टेत भर पडली आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब भेगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून टेमगिरे कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले.
या दिमाखदार सोहळ्यास नगरसेवक संदीपनाना शेळके, यशस्वी उद्योजक सुधाकर शेळके तसेच देवाभाऊ गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांनी यावेळी स्व. संभाजीभाऊंच्या आठवणींना उजाळा देत टेमगिरे कुटुंबीयांच्या या सामाजिक दायित्वाची प्रशंसा केली. या कमनीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी टेमगिरे परिवाराने विशेष प्रयत्न केले, तर टाकवे बुद्रुकच्या समस्त ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य दिले. गावाची अस्मिता जपणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून, बैलगाडा शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले, माजी चेअरमन मारुती असवले, माजी सरपंच भुषण असवले, सरपंच अविनाश असवले, शिवसेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे,माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, उद्योजक अनिलशेठ मालपोटे,प्रसिद्ध दुग्ध व्यवसायिक प्रकाश कोंडे, माजी चेअरमन दत्ता घोजगे, बाबाजी असवले,चेअरमन अंकुश आंबेकर,मा.उपसरपंच स्वामी जगताप, व्हा.चेअरमन विकास असवले, माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड, अध्यक्ष बाबुशेठ ओसवाल, ट्रस्ट अध्यक्ष साहेबराव टेमगिरे, युनियन लीडर दत्ताभाऊ टमगिरे, गुणवंत कामगार तानाजी टेमगिरे, उद्योजक संदिपशेठ टेमागिरे, उद्योजक सागर टेमगिरे, युवा उद्योजक प्रणवदादा टेमगिरे, युवा उद्योजक तुषारदादा टेमगिरे यासह मोठ्या बैलगाडा शौकीन उपस्थितीत होते.



