भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून टाकवे गणातील अनुयायांसाठी अश्विनीताई कोंडे यांच्याकडून मोफत बस सेवा; सामाजिक बांधिलकीचे दर्शन

टाकवे बुद्रुक – ऐतिहासिक भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून, टाकवे पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या (शिंदे गट) अधिकृत उमेदवार सौ. अश्विनी सोमनाथ कोंडे (आसवले) यांच्या वतीने समाज बांधवांसाठी विशेष बस सेवेची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक अनुयायांना विजयस्तंभाला अभिवादन करणे सोयीचे झाले.
दरवर्षी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे लाखो भीम सैनिक आणि समाज बांधव विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमा होतात. टाकवे बुद्रुक आणि परिसरातील नागरिकांना या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जाता यावे आणि प्रवासाची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, या उदात्त हेतूने सौ. अश्विनीताई कोंडे यांनी पुढाकार घेत ही बस सुविधा उपलब्ध करून दिली.
यावेळी बोलताना समर्थकांनी सांगितले की, “शौर्य दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन जाण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. अश्विनीताईंनी नेहमीच समाजाच्या सुख-दुःखात आणि उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.”
शिवसेना (शिंदे गट) आणि सौ. अश्विनी सोमनाथ कोंडे यांच्या या जनहितकारी उपक्रमाचे टाकवे पंचक्रोशीतील नागरिक आणि भीम सैनिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. या बस सुविधेचा लाभ अनेक समाज बांधवांनी घेतला असून, त्यांनी आयोजकांचे आभार मानले आहेत.



