सामाजिक

हरिद्वारमध्ये पुणेरी पगडीचा मान! योगगुरू स्वामी रामदेव बाबांचा पुणे आणि मावळच्या शिलेदारांकडून विशेष सन्मान

Spread the love

   हरिद्वार/पुणे- जागतिक स्तरावर योगाचा प्रचार आणि प्रसार करणारे योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांचा हरिद्वार येथे ‘पुणेरी पगडी’ घालून मानाचा सन्मान करण्यात आला. पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे नुकत्याच पार पडलेल्या ४ दिवसीय प्रगत योग प्रशिक्षण शिबिरादरम्यान हा खास सोहळा पार पडला.

पतंजली योगपीठामध्ये आयोजित या निवासी शिबिरासाठी देशभरातून विविध राज्यांतील निवडक योग शिक्षक आणि कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या शिबिरात पुण्यासह मावळ तालुक्यातील योग साधकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

प्रशिक्षणादरम्यान, योग प्रसारामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे टीमच्या वतीने स्वामी रामदेव बाबांचा यथोचित सन्मान करण्यात आला. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख असलेली ‘पुणेरी पगडी’ योगगुरूंना परिधान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी आळंदी येथील कीर्तनकार श्रीमंत करांडे, डॉ. वाघ, उत्तरेश्वर तोडकरजी यांच्यासह पतंजली मावळचे ‘भारत स्वाभिमान’चे तहसील प्रभारी आणि योगशिक्षक श्री. संतोष जांभूळकर हे विशेष उपस्थित होते. मावळ आणि पुणे विभागातून गेलेल्या या शिष्टमंडळाने स्वामी रामदेव बाबांचे आशीर्वाद घेतले. या सन्मानामुळे हरिद्वारमध्ये पुणेरी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button