
टाकवे (ता. मावळ) — धो. य. खांडभोर (गुरुजी) चॅरिटेबल ट्रस्ट, पवार हॉस्पिटल आणि लाईफलाईन ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या टाकवे येथील सर्वसमावेशक आरोग्य शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये एकूण सुमारे १४० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
शिबिरात श्वसनविकार तपासणी, नेत्र तपासणी, एचआयव्ही तपासणी यांसह विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या. शिबिराची विशेष बाब म्हणजे जवळपास २० तरुणांनी स्वच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
शिबिराचे उद्घाटन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राज खांडभोर, उद्योजक शरद खांडभोर,माजी उपसरपंच स्वामी जगताप, सामाजिक कार्यकर्ते लहुभाऊ वाडेकर,मा.चेअरमन राजु शिंदे, ढाकणे हॉस्पिटल तळेगाव डॉ. स्वाधीन ढाकणे, यांच्या हस्ते संपन्न झाले
या उपक्रमासाठी ढाकणे हॉस्पिटल, तळेगावचे डॉ. स्वाधीन ढाकणे, डॉ. सागर दानी यांचे डॉ. दानी आय क्लिनिक तसेच लाईफलाईन ब्लड सेंटर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच टाकवे गावातील सर्व नागरिक, शिवशाही मित्र मंडळ टाकवे सक्रिय सहभागामुळे शिबिर यशस्वी ठरले.
भविष्यात पवार हॉस्पिटलच्या वतीने असेच विविध आरोग्य उपक्रम सातत्याने राबवून नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प असल्याचे डॉ. पवार बी. एस. यांनी यावेळी सांगितले.



