
टाकवे बुद्रुक — आंदर मावळ सह टाकवेतील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरवत एकवीरा हॉस्पिटलने अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी तज्ञ डॉक्टर्स आणि २४ तास सेवा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उत्तम उपचार मिळावेत या उद्देशाने हॉस्पिटलने विविध विभागांची सुसज्ज व्यवस्था उभारली असून, नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
हॉस्पिटल संचालक डॉ. सुनिल शंकर ओटी व डॉ. शीतल सुनिल ओटी यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमध्ये अनेक महत्त्वाच्या सुविधा सुरू आहेत. त्यामध्ये ३० बेड्सचे रजिस्टर्ड हॉस्पिटल, विशेष पुरुष-स्त्री जनरल वॉर्ड, आयसीयू, सर्जिकल रूम, डिलिव्हरी रूम आदींचा समावेश आहे. तसेच जनरल मेडिसिन, सर्जरी, हाडाचे आजार, स्त्रीरोग, बालरोग अशा विविध तज्ञ डॉक्टरांच्या नियमित भेटी सुरू आहेत.
२४ तास फार्मसी, रुग्णवाहिका सेवा, तसेच घरापर्यंत डॉक्टरांची भेट—ही सुविधा ग्रामीण रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आपत्कालीन अवस्थेत रुग्णांना व वेळेअभावी हॉस्पिटलपर्यंत पोहोचता न आल्यास डॉक्टर स्वतः त्या ठिकाणी भेट देऊन उपचार करण्याची व्यवस्था हॉस्पिटलने केली आहे.
HDFC ERGO, आदित्य बिर्ला, MD इंडिया, Ericsson या कंपन्यांच्या कॅशलेस सुविधाही उपलब्ध झाल्याने रुग्णांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जनआरोग्य (MJPJAY), तसेच ESIC सेवाही लवकरच सुरू होणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले.



