“प्रभाग 16 च्या नवनिर्माणासाठी ‘कपबशी’ दाबा… सायलीताईंसोबत विकासाचा प्रवास पुढे न्या!”
वडगाव नगरपंचायत रणधुमाळी 2025
वडगाव मावळ – प्रभाग क्रमांक १६ च्या नवनिर्माणाचा प्रवास, गेल्या काही वर्षांत ज्या हातांनी प्रामाणिकपणे घडवला… त्या हातांवर आज पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यासाठी मतदारांचा मोठा कल उमटताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार सायली म्हाळसकर यांना निवडणूक आयोगाकडून ‘कपबशी’ हे अधिकृत चिन्ह मिळताच प्रभागात नव्या आशेची, नव्या विकासाची दीपशिखा प्रज्वलित झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
सायलीताईंच्या नगरसेवक ते उपनगराध्यक्ष या प्रवासात प्रभागातील प्रत्येक घराशी, प्रत्येक कुटुंबाशी भावनिक नातं जोडले गेले. नागरिकांच्या अडचणी म्हणजे आपली जबाबदारी, विकास म्हणजे कर्तव्य आणि सेवा म्हणजे कर्तव्यपूर्ती—ही भावना सायलीताईंच्या कामात वेळोवेळी दिसून आली. पाण्याच्या समस्येपासून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी, स्वच्छतेपासून महिलांच्या उपजीविकेपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून काम केले.
घराघरात त्यांना एक परिचित, विश्वासू चेहरा म्हणून पाहिले जाते. “आमच्या प्रभागात बदल घडवायला जर कोणी जिद्दीने उभे राहिले असेल, तर त्या सायलीताई,” असे मतदार प्रेमाने सांगतात. वृद्धांना आधार, महिलांना प्रोत्साहन आणि युवकांना मार्गदर्शन—ही त्यांची कार्यशैली प्रभागाला केवळ विकसितच नाही, तर संवेदनशीलपणे सक्षमही बनवत आली आहे.
निवडणूक आयोगाकडून ‘कपबशी’ चिन्ह मिळाल्यानंतर सायली म्हाळसकर यांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. “प्रभाग १६ माझ्यासाठी केवळ मतदारसंघ नाही, हे माझे कुटुंब आहे. आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी मी आजवर सातत्याने काम केले आणि पुढेही संपूर्ण मनाने करणार आहे. प्रभागाच्या नवनिर्माणासाठी ‘कपबशी’ समोरील बटण दाबून पुन्हा एकदा मला सेवा करण्याची संधी द्यावी ही मनापासून विनंती,” असे त्या म्हणाल्या.
त्यांच्या प्रचारात कोणतेही मोठे वल्गन नाही, गाजावाजा नाही… आहे ती फक्त लोकांशी मनापासूनची जवळीक. महिला त्यांना आपल्या घरातील मुलगी, ताई म्हणून भेटतात; तर तरुण त्यांचा जलद निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवतात. अनेकांनी आपसूकच प्रचाराची धुरा हातात घेतली असून, “आमच्या प्रभागाचा विकास थांबू नये” असे सांगत ‘कपबशी’चे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवू लागले आहेत.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये वातावरण भावनिक, ऊर्जावान आणि विकासाभिमुख बनू लागले आहे. नागरिकांच्या मनात सायली म्हाळसकरांविषयी असलेला विश्वास, त्यांचा सेवाभाव आणि सातत्याने केलेल्या कामांची उब प्रभागभर जाणवत असल्याचे दिसून येत आहे.



