सामाजिकमावळ

स्व. बनाबाई गभाले यांच्या स्मरणार्थ सहारा वृद्धाश्रमात रेशन किट वाटप

.

Spread the love

कुसवली – श्रीमती कै. बनाबाई बबन गभाले यांच्या स्मरणार्थ गभाले परिवाराच्यावतीने सहारा वृद्धाश्रम, कुसवली येथे रेशन किट वाटप कार्यक्रम संपन्न झाला. समाजकारणाची ओळख जपणाऱ्या गभाले परिवाराच्या या उपक्रमाने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुसवलीच्या सरपंच चंद्रभागा दाते, आदर्श सरपंच राजेश कोकाटे, सरपंच माऊली आढारी, आदर्श सरपंच गुलाब गभाले, ट्रायबल फोरमचे मा. अध्यक्ष मधुकर कोकाटे, ट्रायबल फोरम पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम भाऊ हेमाडे, सरपंच अनंता शेठ पावशे, नामदेव गोंटे, बजरंग लोहोकरे सर, नवनाथ दगडे व बाळासाहेब दाते आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते वृद्धाश्रमातील सर्व रहिवाशांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे परंपरागत सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला वृद्धाश्रमातील आजी-आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button