
माळेगाव शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी सुनिल गायकवाड सर यांना जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित
टाकवे बुद्रुक – वरसुबाई विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सुनील गायकवाड यांना त्यांच्या प्रामाणिक सेवाभाव, निष्ठा व शाळेच्या कार्यात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पुणे विभागाचे उपसंचालक डाॅ.गणपत मोरे,पुणे जिल्हा परिषद माध्यमिक चे शिक्षणाधिकारी डाॅ.भाऊसाहेब कारेकर,यांचे शुभहस्ते जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त अरून थोरात,शिवाजी किलकीले, जिल्हा अध्यक्ष प्रसाद गायकवाड, जिल्हा सचिव शिवाजी कामठे, भानूदास रिठे व संघाचे आजी माजी पदाधीकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून सुनील गायकवाड यांनी विद्यालयात स्वच्छता, शिस्त, विद्यार्थी व शिक्षकांना सहकार्य या सर्व बाबींमध्ये अपूर्व योगदान देत आहेत. शाळेच्या प्रत्येक उपक्रमात त्यांनी मनापासून सहभाग नोंदवून “शाळा हीच माझे कुटुंब” या भावनेने काम केले असल्याने पुरस्कार मिळाल्याबद्दल वरसुबाई शाळा परिवारात व पालकवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त बी एम भसे,जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष राजेश गायकवाड,बाळासाहेब उभे,एन डी पवार,विठ्ठल माळशिकारे,विकास तारे व पत्रकार मनोहर दाभाडे यांनी गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



