टाकवे बुद्रुक जिल्हा परिषद शाळा होणार मॉडेल स्कूल
आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून १ कोटी ४५ लाख निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन

टाकवे बुद्रुक – पुणे मॉडेल स्कूल अंतर्गत टाकवे जिल्हा परिषदेच्या शाळेला १ कोटी ४५ लक्ष निधीच आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मंजूर करुन देण्यात आला नुकतेच या कामांचे भूमिपूजन महायुतीच्या नेत्यांच्या हस्ते संपन्न झाले
त्यात सुसज्ज वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक ग्रंथालय, स्वच्छतागृह, संरक्षण भिंत, सौर ऊर्जा प्रकल्प, डिजिटल बोर्ड अशा सुविधांचा समावेश असणार आहे यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अधिक सुलभ होणार आहे आपुर्व कंट्रन्शनच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे
या भुमिपुजन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष मारुती असवले,मा सरपंच किसन ननवरे,मा.चेअरमन नारायण मालपोटे, सरपंच अविनाश असवले, शालेय समिती अध्यक्ष संदीप मालपोटे,उपसरपंच आशा मदगे, प्रतिक्षा जाधव, सदस्य सोमनाथ असवले, सदस्य विश्वनाथ असवले,भाजप सरचिटणीस तालुका रोहिदास असवले, पोलिस पाटील अतुल असवले, उद्योजक अनिल मालपोटे, शेखर मालपोटे, माजी उपसरपंच परशुराम मालपोटे, मा चेअरमन राजु शिंदे,चेअरमन तानाजी गुणाट, खादी ग्रामोद्योग चेअरमन अंकुश आंबेकर,भाजप टाकवे अध्यक्ष दत्ता असवले, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन असवले, अल्पसंख्याक अध्यक्ष मुन्नावर आत्तार,तज्ञ संचालक श्रीकांत मोढवे, गणेश काटकर, माजी उपसरपंच सतु दगडे, माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे,मा शालेय समिती अध्यक्ष अनिल असवले,माजी उपसरपंच स्वामी जगताप, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष योगेश मोढवे,जिप संघटना अध्यक्ष उल्हास असवले,माजी चेअरमन दिलीप आंबेकर, माजी चेअरमन योगेश गायकवाड,मा चेअरमन चंद्रकांत वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते विलासराव साबळे, ठेकेदार बजरंग इंगळे, केंद्र प्रमुख संगिता बालगरे,मुख्याध्यापक अतुल गायकवाड आदी जण उपस्थितीत होते.



