पिंपरी चिंचवडमावळराजकीय

प्रचारातून थोडा वेळ काढत क्रिकेटच्या मैदानात– अश्विनी सोमनाथ कोंडे यांची भोयरे येथील क्रिकेट स्पर्धेत उपस्थितीत

Spread the love

 

भोयरे- टाकवे पंचायत समिती गणातील सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या इच्छुक उमेदवार अश्विनी सोमनाथ कोंडे यांनी प्रचारातून थोडा वेळ काढत भोयरे येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेतील पारितोषिक वितरण सोहळ्यात विशेष उपस्थिती लावली. ग्रामीण भागातील तरुणाईला खेळाच्या माध्यमातून निरोगी समाजाची दिशा मिळावी, यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या स्पर्धेत परिसरातील विविध गावांमधील संघांनी सहभागी होऊन उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात खेळाडूंनी दाखविलेली शिस्त, संघभावना आणि जिंकण्याची जिद्द पाहून उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विजेत्या संघाला ट्रॉफी आणि रोख पारितोषिक तसेच उपविजेत्या संघाला मानचिन्ह प्रदान करण्यात आले. खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार उत्तम गोलंदाज, उत्तम फलंदाज आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू अशी पारितोषिकेही देण्यात आली.

या प्रसंगी बोलताना अश्विनी कोंडे म्हणाल्या, “ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड गुण आहेत. परंतु त्यांना योग्य प्रोत्साहन मिळाले तरच ते राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकू शकतात. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर निवड झाल्यास खेळासाठी आवश्यक सुविधांची उभारणी, मैदानांचे सुशोभीकरण आणि क्रीडा साहित्य उपलब्धता यावर विशेष भर देण्याचा माझा प्रयत्न असेल.” त्यांनी खेळाडूंना निरोगी शरीर, स्वच्छ समाज आणि एकजूट या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहनही केले यासह युवा पिढीने सकारात्मक वाटचालीसाठी खेळाचा मार्ग निवडला तर समाजातील गैरप्रवृत्ती कमी होऊ शकतात, असा संदेश यावेळी देण्यात आला.

अश्विनी सोमनाथ कोंडे यांनी आपल्या सहज, जमिनीवरच्या व लोकाभिमुख स्वभावामुळे अल्पावधीतच परिसरातील महिलांपासून युवकांपर्यंत मजबूत संपर्क साधला आहे. निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु असला तरी सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रमांना वेळ देत त्यांनी लोकांशी थेट संवाद कायम ठेवला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button