
वराळे : पंचायत समिती सदस्य पदाचे इच्छुक उमेदवार अतुल मराठे यांच्या प्रचाराला वराळे गणात दिवसेंदिवस भक्कम गती मिळताना दिसत आहे. गावभेटीदरम्यान नागरिकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद हा मराठे यांच्या कार्यशैलीवरील आणि व्यक्तिमत्त्वावरील विश्वासाचा स्पष्ट पुरावा मानला जात आहे.
अतुल मराठे यांनी नुकतीच सांगवी येथील जाखमातेच्या मार्गशीर्ष पालखी सोहळ्यात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी सांगवी ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भक्कम पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
गावोगावी सुरू असलेल्या भेटीत तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मराठे यांची लोकप्रियता वाढती असल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवते. विकासाभिमुख दृष्टीकोन, संवादकौशल्य आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे ते गणातील मतदारांमध्ये विश्वासार्ह पर्याय ठरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
वराळे गणात निर्माण झालेल्या या सकारात्मक वातावरणामुळे आगामी निवडणुकीत अतुल मराठे मजबूत स्पर्धक म्हणून उभे राहत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



