मावळ

राजपुरीत विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश वाटप; सरपंच सागर  शिंदे व सागर वंजारे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Spread the love

राजपुरीगावातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचा उत्साह वाढावा या उद्देशाने सरपंच सागर भाऊ शिंदे (युवा मंच राजपुरी) तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर भाऊ वंजारे यांच्या सौजन्याने शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेशाचे उत्साहात वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून आले. नवीन स्पोर्ट्स गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा आत्मविश्वास आणि उत्साह दुणावला आहे. क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेली प्रेरणा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

कार्यक्रमावेळी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी सरपंच सागर भाऊ शिंदे आणि अध्यक्ष सागर भाऊ वंजारे यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे गावकऱ्यांनीही कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मोठी मदत होते, असे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button