टाकवे येथे रेशनिंग कार्ड कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद
भैरवनाथ मंदिर परिसरात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपक्रम
टाकवे बुद्रुक – आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानातून नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने टाकवे येथील भैरवनाथ मंदिरात रेशनिंग संदर्भातील विविध समस्या सोडविण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
या कॅम्पमध्ये नवीन रेशनकार्ड काढणे, नाव समाविष्ट करणे किंवा कमी करणे, जुने रेशनकार्ड ऑनलाइन करणे, कार्ड विभक्त करणे यांसारख्या विविध समस्यांसाठी नागरिकांकडून अर्ज स्वीकृत करण्यात आले. भरलेले अर्ज आठ दिवसांच्या आत सोडविण्याची खात्री प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या उपक्रमात टाकवे, फळणे, बेलज, घोणशेत, राजपुरी या गावांतील 200 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी टाकवे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, विश्वनाथ असवले, सुजित सातकर, संतोष मालपोटे, सोमनाथ आंद्रे,सतिश वावरे, प्रशांत जांभळे, दिपक शिंदे आदींनी पुढाकार घेतला.



