राजकीय

टाकवे पंचायत समिती गणात ‘शिवशक्ती-भीमशक्ती’चा एल्गार; अश्विनी कोंडे-असवले यांना आरपीआयची भक्कम साथ!

Spread the love

टाकवे बुद्रुक: टाकवे पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत एक मोठी आणि निर्णायक राजकीय घडामोड समोर आली आहे. या गणात ‘शिवशक्ती आणि भीमशक्ती’ यांच्या मनोमीलापाचे संकेत मिळाले असून, शिवसेना (शिंदे गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्यात एकीचे सूर उमटले आहेत.

टाकवे पंचायत समिती गणातील शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. अश्विनी सोमनाथ कोंडे-असवले यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात आरपीआयचे नेते सुर्यकांत वाघमारे यांच्या समवेत अत्यंत सकारात्मक चर्चा पार पडली असून, लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे.

मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता, समविचारी मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि महायुतीची ताकद वाढवण्यासाठी एकमताने निर्णय घेण्यात येत आहे. त्यानुसार, आता सुर्यकांत वाघमारे हे आपली ताकद सौ. अश्विनी कोंडे-असवले यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे समजते.

टाकवे गणात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. सुर्यकांत वाघमारे यांच्यासारख्या तगड्या नेत्याचा पाठिंबा मिळाल्यास, सौ. अश्विनी कोंडे-असवले यांची बाजू भक्कम होणार असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. या युतीमुळे टाकवे गणात विजयाचे समीकरण सोपे होईल, असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या प्राथमिक चर्चा यशस्वी झाली असून, लवकरच एका संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे किंवा मेळाव्याद्वारे या युतीची आणि पाठिंब्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button