राजकीय

आंबळे सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास शेटे यांची बिनविरोध निवड 

Spread the love

वडगाव मावळ :आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच रामदास (बाळा) यशवंत शेटे यांची बिनविरोध निवड होत सहकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवड प्रक्रिया शांत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

मावळते अध्यक्ष बाबाजी वायकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात निवड प्रक्रिया राबविण्यात आली. अध्यक्षपदासाठी रामदास शेटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेश निखारे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. या निर्णयानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

यावेळी संचालक सिताराम आंभोरे, बंडू कदम, मोहन घोलप, बंडू घोजगे, बाबाजी वायकर, पांडुरंग शेटे, विलास भालेराव, सिंधूबाई शेटे, सुलाबाई कदम आणि मंगेश चतुर उपस्थित होते.

निवड जाहीर झाल्यानंतर रामदास शेटे यांनी ग्रामदैवत पोटोबा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. मंदिर परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. वातावरणात उत्साह आणि समाधानाची भावना दिसून येत होती.

जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुकाणू समितीचे सदस्य गोविंदराव आंभोरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, युवा नेते देवा गायकवाड, रोहीदास मराठे तसेच पोलीस पाटील शंकरराव आंभोरे यांनी शुभेच्छा देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सरपंच राजेश कोकाटे, यशवंत शेटे, श्रीकांत मोढवे, पांडुरंग मोढवे, नवनाथ मोढवे, संदीप मोढवे, तेजस मोढवे, अनिल बाबर, अरविंद बधाले, मयूर नरवडे, जयेश शेटे, स्वप्नील शेटे, प्रविण बधाले, अक्षय शेटे, पांडुरंग शेटे, मारुती शेलार, भरत आंभोरे, जगन हांडे, संदीप हांडे, सीताराम आंभोरे, चंद्रकांत घोलप, गोरख घोलप, जयेश शेटे, प्रल्हाद शेटे आणि विक्रम हेमाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन घोलप यांनी केले. नवनाथ मोढवे यांनी सूत्रसंचालन केले, तर हनुमंत हांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

रामदास शेटे यांच्या बिनविरोध निवडीमुळे आंबळे परिसरातील सहकार चळवळीत नव्या पिढीला नेतृत्वाची संधी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कामकाजाला नवे बळ आणि दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

 

नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास शेटे म्हणाले,
आंबळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. हा विश्वास जपत सहकार क्षेत्रात पारदर्शक, शेतकरी-केंद्रित आणि विकासाभिमुख काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. आमदार सुनील शेळके, सहकारमहर्षी माऊली दाभाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल अधिक सक्षम आणि प्रगतीशील करण्याचा निर्धार आहे.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button