सोमवारी टाकवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ
एक कोटी निधीतुन होणार विविध विकासकांमे

टाकवे बुद्रुक – टाकवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या विकासप्रवासात सोमवारी ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे. ग्रामपंचायत हद्दीत तब्बल एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ तसेच डस्टबिन वाटप उपक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीने गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निवडलेल्या प्रकल्पांमध्ये रस्त्यांची सुधारणा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, स्वच्छता व्यवस्थेचा विस्तार, सार्वजनिक उपयुक्त सेवा, तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांचा समावेश आहे.
स्वच्छता मोहिमेला नवी गती देण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे घराघरात डस्टबिनचे वितरण करण्यात येणार असून, गाव स्वच्छ आणि सुशोभित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
विद्यमान सरपंच अविनाश असवले यांनी कार्यकाळात सर्वाधिक विकासनिधी प्रभावीपणे खर्च करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक प्रलंबित योजनांना गती मिळाली असून टाकवे ग्रुपच्या सर्व गावांमध्ये विकासाचा वेग लक्षणीयरीत्या वाढल्याची नोंद ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. सोमवारी होणाऱ्या या भव्य शुभारंभामुळे टाकवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या विकासकामांना नवे बळ मिळणार आहे.