वैद्यकीय

टाकवे बुद्रुकमध्ये आरोग्यसेवेला नवी दिशा : सेवा क्लिनिकचा मोफत तपासणी कॅम्प आणि एकविरा हॉस्पिटलची अत्यल्प खर्चातील शस्त्रक्रिया योजना

आंदर मावळातील नागरिकांना होणार लाभ

Spread the love

टाकवे बुद्रुक — ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी टाकवे परिसरात दोन महत्त्वाच्या आरोग्य उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. सेवा क्लिनिक, टाकवे यांच्या वतीने 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2025 दरम्यान महिलांसाठी व लहान बालकांसाठी मोफत तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. तर एकविरा हॉस्पिटल, टाकवे येथे 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत विविध शस्त्रक्रियांसाठी विशेष सवलत कॅम्प राबवला जाणार आहे.

या दुहेरी आरोग्य उपक्रमाचा थेट लाभ आंदर मावळातील जवळपास ४० गावांतील नागरिकांना मिळणार असून, तालुक्याबाहेरील तळेगाव–सोमाटणे परिसरात जाण्याची गरज कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले आहे.

सेवा क्लिनिक – मोफत आरोग्य तपासणी कॅम्प (15 ते 22 डिसेंबर)

महिला व बालकांच्या आरोग्य संरक्षणाला प्राधान्य देत खालील सेवा शंभर टक्के मोफत पुरवल्या जाणार आहेत :

•सर्वसाधारण आरोग्य तपासणी

•शुगर तपासणी

•रक्तदाब तपासणी

•ईसीजी (गरजेनुसार विनामूल्य)

•गर्भवती मातांची विशेष तपासणी

•हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी

रुग्णांनी औषधे त्यांच्या पसंतीच्या मेडिकलमधून स्वतः खरेदी करावीत.

ठिकाण : सेवा क्लिनिक, बाळराजे कॉम्प्लेक्स, एसटी स्टॅन्डजवळ, टाकवे बुद्रुक 

संपर्क : डॉ. शितल सुनिल औटी – 9284464284 / 9307866276

 

एकविरा हॉस्पिटल – सवलतीचा शस्त्रक्रिया कॅम्प (23 ते 31 डिसेंबर)

परिसरातील रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळावा म्हणून विविध शस्त्रक्रिया 50% सवलतीत करण्यात येणार आहेत :

•जुन्या ऑपरेशनमधील रॉड/प्लेट काढणे

•अपेंडिक्स शस्त्रक्रिया

•पिशवीचे ऑपरेशन (Hysterectomy)

•मूळव्याद उपचार (ओपन व लेझर)

•हाडांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया

औषधांचा खर्च रुग्णांना स्वतंत्रपणे भरावा लागेल. योग्य नियोजनासाठी आगाऊ नाव नोंदणी अनिवार्य आहे.

संपर्क : डॉ. सुनिल शंकर औटी – 9307866276पत्ता : एकविरा हॉस्पिटल, नंदाई कॉम्प्लेक्स, टाकवे बुद्रुक, ता. मावळ

टाकवे परिसरात प्रथमच इतक्या व्यापक स्वरूपाचे आरोग्य उपक्रम राबवले जात असल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसुधारण्यासाठी हा उपक्रम एक प्रभावी पाऊल ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button