राजकीय

टाकवे गणात ‘महायुती’चा एल्गार! शिंदे गटाच्या अश्विनी कोंडे-असवले यांच्या पाठिशी भाजपची ताकद; विजयाचा मार्ग सुकर?

.

Spread the love

वडगाव मावळ – मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे . टाकवे पंचायत समिती गणात एक मोठी घडामोड समोर आली असून, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात युती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. टाकवे गणातून शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. अश्विनी कोंडे-असवले यांना भाजपने आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

वडगाव येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या युतीमुळे टाकवे गणात शिंदे गटाची ताकद दुप्पट झाली असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या बैठकीत माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) गणेश भेगडे, पुणे जिल्हा बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे आणि शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजू खांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.

टाकवे गण हा पूर्वीपासूनच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि भाजपचे वर्चस्व असलेला मानला जातो. यापूर्वी याच मतदारसंघातून माजी उपसभापती शांताराम कदम यांनी विजय मिळवला होता. भाजपची या भागात असलेली मजबूत पकड आणि संघटनात्मक ताकद आता अश्विनी कोंडे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यामुळे अश्विनी कोंडे यांचा विजयाचा मार्ग आता अधिक सुकर झाल्याचा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. 

पुणे जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अतिष परदेशी माजी सभापती गुलाबराव म्हाळकस्कर, माजी उपसभापती शांताराम कदम, खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले, उपसभापती अमोल भोईरकर,तालुका सरचिटणीस रोहीदास असवले,उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे,आंदर मावळ भाजप अध्यक्ष गणेश कल्हाटकर,टाकवे शहर भाजप अध्यक्ष दत्ता असवले,माजी सरपंच कैलास खांडभोर, युवा नेते अमोल जगताप, माजी उपसरपंच मदन शेंडगे, अविनाश घोजगे,अक्षय असवले यांच्या अन्य पदाधिकारी या बैठकीत उपस्थितीत होते. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button