राजकीयमहाराष्ट्रसामाजिक

पत्रकार आणि राज्यकर्ते शत्रू नव्हे, लोकशाहीचे हितचिंतक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी पत्रकार संघाचा फिनिक्स पुरस्कार स्वीकारताना मुख्यमंत्र्यांचा संदेश; श्री श्री रविशंकर यांचीही उपस्थिती

Spread the love

मुंबई : मुंबईत मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “पत्रकारांनी सत्याची दुसरी बाजू निडरपणे मांडावी आणि राज्यकर्त्यांनी टीकेला घाबरू नये, हाच लोकशाही मजबूत ठेवण्याचा खरा मंत्र आहे.”

यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जलपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “पत्रकारितेमुळे राज्यकर्त्यांना दिशादर्शन मिळते. पत्रकारांना आधार देणे हे कोणत्याही सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. हा पुरस्कार माझ्या कामगिरीपेक्षा लोकांच्या विश्वासाचा सन्मान आहे.”

श्री श्री रविशंकर यांनी म्हटले, “टीका आणि प्रशंसेचा समतोल साधणारे व्यक्तिमत्त्वच खरे कौतुकास पात्र असते. फडणवीस यांना पुरस्कार देऊन पत्रकार संघाने योग्य निवड केली आहे.” कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, तसेच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button