महावितरण प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी? सुरक्षिततेचा अभाव, निष्पाप जीवांशी खेळ थांबवा!

टाकवे बुद्रुक – वीज वितरण कंपनीचा (महावितरण) भोंगळ आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. टाकवे गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील परिसरातील उघड्यावर असलेल्या विद्युत रोहित्राच्या (DP) अतिशय जवळ आणि चक्क त्याच्या संरक्षक भिंतीवर चढून लहान मुले खेळत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे
सदर वीज प्रवाहाने भरलेल्या या डीपीला कोणत्याही प्रकारचे सुरक्षित कुंपण नाही किंवा ते आजूबाजूला वाळलेल्या गवताचे साम्राज्य पसरले आहे, ज्यामुळे आगीचा धोकाही संभवतो. अशा अत्यंत धोकादायक ठिकाणी लहान मुले बिनधास्तपणे वावरत आहेत. वीज वितरण कंपनीने केवळ वीज बिले वसूल करण्यावर भर न देता, अशा जीवघेण्या समस्यांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी जर उद्या एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालक करत आहेत.
प्रशासनाने कुंभकर्णी झोप सोडून या डीपीला तत्काळ लोखंडी जाळीचे कुंपण घालावे आणि परिसर स्वच्छ कराव्यात अशी मागणी समिर धनवे, पप्पू असवले, बाळासाहेब असवले, यांनी केली आहे.