प्रशांत दादा भागवत यांची पर्यावरण संरक्षणाची वाटचाल
घोषणांवर न थांबता प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे आदर्श; “झाडे लावा, झाडे जगवा” संदेशाने युवकांना प्रेरणा

मावळ प्रतिनिधी :
राजकारणात केवळ घोषणाबाजी करणाऱ्यांची परंपरा मोडून प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे आदर्श ठेवणारे नाव म्हणजे प्रशांत दादा भागवत. सामाजिक बांधिलकीसोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी स्वतःच्या कार्यातून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

१९ जून २०२५ रोजी वाढदिवसानिमित्त दादांनी आंबा, नारळ, वड, पिंपळ, कैलासपती व खाया या झाडांचे वृक्षारोपण केले. मात्र, इथेच थांबण्याऐवजी या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. पाणी घालणे, खत टाकणे, तण काढणे अशा संगोपनामुळे ही झाडे आता जोमाने वाढत आहेत.
“फक्त झाडे लावून फोटो काढणे म्हणजे पर्यावरण संरक्षण होत नाही; खरी जबाबदारी म्हणजे त्या झाडांचे संगोपन करणे,” असे दादांचे मत असून, त्याची ते प्रत्यक्ष कृतीतून अंमलबजावणी करत आहेत.
पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता दाखवणारे प्रशांत दादा भागवत हे केवळ राजकीय नेते म्हणूनच नव्हे, तर समाजसेवक आणि पर्यावरण संरक्षक म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येत असले तरी लोकांचा विश्वास हा त्यांच्या वृक्षप्रेमी कार्यामुळे अधिक दृढ होत आहे.
“झाडे लावा, झाडे जगवा” या संदेशाला आपल्या कृतीतून जिवंत केलेल्या दादांच्या वृक्षप्रेमामुळे मावळातील युवकांना नवी प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक चळवळींना नवी ऊर्जा मिळत असून, लोकांना पर्यावरण रक्षणाची जाणीव अधिक ठळकपणे पटत आहे.



