टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारीपदी आप्पा भानुसे; बाळासाहेब मतकर यांच्या जागी नियुक्ती

टाकवे बुद्रुक: मावळ तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारीपदी आप्पा भानुसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे अधिकारी बाळासाहेब मतकर यांना पदोन्नती मिळाल्याने रिक्त झालेल्या जागी ही खांदेपालट करण्यात आली आहे.
मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) कुलदीप प्रधान यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी टाकवे बुद्रुक येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मतकर यांना प्रशासकीय पदोन्नती मिळाल्याने त्यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी आता आप्पा भानुसे यांची वर्णी लागली आहे.
भानुसे हे अनुभवी अधिकारी असून त्यांच्या नियुक्तीमुळे गावातील प्रशासकीय कामकाजाला आणि प्रलंबित विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवनिर्वाचित ग्रामविकास अधिकारी आप्पा भानुसे यांचे ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
