सामाजिक

जनसेवेचा वसा आणि नववर्षाचा संकल्प! युवा नेते अतुल मराठे यांच्या वतीने २०२६ च्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार प्रकाशन

Spread the love

वडगाव मावळ – येत्या नववर्षाच्या स्वागतासाठी वराळे पंचायत समिती गणातील नागरिक सज्ज झाले असून, जनसेवेची ही परंपरा अधिक दृढ करण्यासाठी युवा नेते वराळे पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार अतुल भाऊ काळूराम मराठे यांच्या वतीने गणातील समस्त नागरिकांसाठी ‘सन २०२६’ च्या नूतन दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) प्रकाशन आज मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या प्रकाशन सोहळ्यासाठी मावळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुनील अण्णा शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या साक्षीने ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खंडगे, माजी सभापती विठ्ठल अण्णा शिंदे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश आप्पा ढोरे, दीपक भाऊ हुलावळे, साहेबराव कारके तसेच तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दिनदर्शिकेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचतानाच, सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळावी, हा उदात्त हेतू या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी व्यक्त केले. उपस्थितांनी अतुल भाऊ मराठे यांच्या या जनसंपर्क उपक्रमाचे कौतुक केले असून आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button