मावळ

टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील नामफलकाचे तोडफोड केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीन विरोधात गुन्हा दाखल

Spread the love

वडगाव मावळ : टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीजवळील नामफलकाची तोडफोड अज्ञात व्यक्तीनी केली असल्याची घटना आज दुपारच्या वेळत घडली असल्याची माहिती समोर आली आहे 

या प्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स (NCR) दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 324(4) अंतर्गत ही नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश मारुती असवले यांनी याबाबत तक्रार दिली आहे. 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून वडगाव मावळ पोलिस ठाण्यात एनसीआर क्रमांक 0118/2026 नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेचा अधिक तपास सुरू असून, संबंधित व्यक्तीची ओळख पटवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.याप्रकरणचा पुढील तपास बीट अंमलदार सचिन देशमुख यांच्या मार्फत सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button