जनसंपर्काचा ‘आरसा’ असलेली दिनदर्शिका प्रकाशित; अश्विनीताई कोंडे यांच्या उपक्रमाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून कौतुक

मावळ- टाकवे गणातील नागरिकांच्या समस्या, विविध वाड्या-वस्त्यांवर दिलेल्या भेटी आणि जनसंपर्काचा लेखाजोखा मांडणाऱ्या एका विशेष दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) प्रकाशन नुकतेच संपन्न झाले. शिवसेना (शिंदे गट) टाकवे गणाच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई सोमनाथ कोंडे (असवले) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन ‘संसदरत्न’ खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या दिनदर्शिकेच्या माध्यमातून केवळ तारखांची माहिती न देता, अश्विनीताई कोंडे यांनी मतदारसंघात केलेला जनसंपर्क आणि त्या माध्यमातून समजून घेतलेल्या नागरिकांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. एक प्रकारे हा मतदारसंघातील जनसंपर्काचा आरसाच या उपक्रमातून समोर आला आहे.याप्रसंगी बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी अश्विनीताई कोंडे यांच्या जनसंपर्काचे आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या पद्धतीचे कौतुक केले.
या सोहळ्यासाठी शिवसेना आणि युवासेनेचे अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरदभाऊ हुलावळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख दत्ताभाऊ केदारी, तालुकाप्रमुख रामभाऊ सावंत, तालुका संघटक मदनभाऊ शेडगे, नेते नवनाथभाऊ हरपुडे, उपतालुकाप्रमुख सोमनाथभाऊ कोंडे यांचा समावेश होता.
तसेच यावेळी उमेदवार अश्विनीताई सोमनाथ कोंडे (असवले), अक्षय असवले, अविनाश घोजगे, शरद कोंडे, समीर आगळमे, तन्मय असवले यांच्यासह परिसरातील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



