★ “शांत स्वभाव, दृढ विचार — अनिल मालपोटे यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली” ★
अभिष्टचिंतन विशेष
टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्यातील फळणे गावाचा एक शांत, संयमी, सुसंस्कृत आणि विचारशक्तीने परिपूर्ण चेहरा म्हणजे अनिल काळुराम मालपोटे. राजकारण, सामाजिक कार्य आणि उद्योजकता—या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपली स्वतंत्र छाप उमटवणारा हा नाव आज मावळातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कोणती वेळ कोणती चाल, कुठे काय बोलायचे, कधी शांत रहायचे आणि कधी निर्णय घ्यायचा—याचा सखोल अभ्यास अनिल मालपोटेंना लाभला आहे. म्हणूनच त्यांना संयमी, मितभाषी पण अत्यंत प्रभावी असा विलक्षण दर्जा समाजात मिळतो.
★ कौटुंबिक साथ — यशामागची खरी शक्ती
अनिल मालपोटे यांच्या यशाचा पाया म्हणजे त्यांचे कुटुंब. आई-वडिलांचे आशिर्वाद हा त्यांचा दिशादर्शक प्रकाश. पत्नीची खंबीर साथ आणि भावाची सततची साथ-सोबत यामुळे त्यांचा व्यावसायिक प्रवास अधिक दृढ होत गेला. एकत्र राहण्याची, एकदिलाने निर्णय घेण्याची आणि सर्वांनी एकमेकांना आधार देण्याची संस्कृती त्यांच्या घरात आजही तितक्याच प्रेमाने जपली जाते.
★ शेळके परिवाराचा सहवास — नात्यातील जिव्हाळा
अनिल मालपोटे यांच्या सामाजिक आणि राजकीय आयुष्यात शेळके परिवाराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पै. स्व. सचिन शेळके यांच्या सोबतीने तयार झालेला कौटुंबिक जिव्हाळा आजही तितकाच घट्ट आहे.स्व.सचिन शेळके यांच्या विचाराने प्रेरित होऊन नगरसेवक संदीप नाना शेळके यांचं मार्गदर्शन आणि मावळाचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांचा स्नेह—या दोघांच्या मायेच्या आणि विश्वासाच्या बळावर अनिल मालपोटे यांनी अनेक अडचणी सहज पार केल्या. या सहवासाचा लाभ म्हणजेच समाजकार्य आणि लोकसंग्रह या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी उभारलेली दृढ ओळख.
★ टँकरपासून ते आधुनिक शेती फुल उत्पादन लँड डेव्हलपिंगचा यशस्वी व्यवसाय प्रवास
अनिल मालपोटे यांच्या व्यावसायिक वाटचालीची सुरुवात झाली ती पाण्याच्या टँकर व्यवसायातून. छोट्या सुरुवातींनी त्यांनी मोठे स्वप्न पाहिले. कष्ट, शिस्त आणि लोकांशी राखलेला विश्वास या तिन्ही गोष्टींच्या जोरावर त्यांनी व्यवसायात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
काळाच्या ओघात ही वाटचाल लँड डेव्हलपिंग, अदीराज पेट्रोलियम यासह फुल उत्पादन या महत्त्वाच्या व्यवसायापर्यंत विस्तारली. आज ते आपल्या व्यवसायाच्या बळावर अनेकांना रोजगार देत समाजाला हातभार लावत आहेत.
★ शांत स्वभाव, संयमित विचार — नेतृत्वाची विलक्षण शैली
अनिल मालपोटे यांची खास वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचा शांत स्वभाव. ते कमी बोलतात पण जे बोलतात ते विचारपूर्वक असते. त्यांच्याकडे समस्यांकडे समन्वयाच्या दृष्टीने पाहण्याची क्षमता आहे. राजकारणात कोणती चाल कधी घ्यायची आणि कोणत्या क्षणी शांत राहणे योग्य—हे त्यांना अत्यंत नैसर्गिकपणे जमतं. म्हणूनच समाजात ते जोडणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
★ समाजासाठी असलेली बांधिलकी
उद्योजक असूनही सामाजिक जाण कायम ठेवणे हे अनिल मालपोटेंचे वैशिष्ट्य. गावातील कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, मराठा आंदोलन लक्षणीय सहभाग यासह गोर-गरीबांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते मनापासून सहभागी होतात. लोकांशी असलेला त्यांचा स्नेह, सहज मिळणारी स्मितरेखा आणि मदतीसाठी तत्परता—ही त्यांची खरी ताकद आहे.
उद्योजक अनिल काळुराम मालपोटे यांना वाढदिवसानिमित्त मावळ चौफेर कडून हार्दिक शुभेच्छा!त्यांच्या पुढील वाटचालीला यश, आरोग्य आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा! ✦



