टाकवे पंचायत समिती गणाच्या इच्छुक उमेदवार सुजाता जाधव यांच्या वतीने आदीवांसी बांधवांसाठी मायेची उब

टाकवे बुद्रुक – पंचायत समिती टाकवे गणाच्या इच्छुक उमेदवार सुजाता सोमनाथ जाधव यांच्या वतीने आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त निगडे येथील ठाकरवस्ती वर आदीवासी बांधवांना दिवाळी निमित्ताने मिठाई तसेच थंडी पासुन स्वसंरक्षण व्हावे यासाठी उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सुमारे १५० पेक्षा अधिक कुटुंबातील नागरिकांना जाधव यांच्या वतीने मदत करण्यात आले
दिवाळी सणाचा आनंद आपण घेत असताना इतरांना देखील आपल्या आनंदात सहभागी करुन त्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठी हा एक छोटासा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे पंचायत समिती टाकवे गणाच्या इच्छुक उमेदवार सुजाता सोमनाथ जाधव यांनी सांगितले
ठाकरवस्ती वरील नागरिकांनी देखील दिवाळी निमित्ताने दिलेल्या वस्तू आनंदाने स्वीकार करत सुजाता जाधव यांना पुढील राजकीय प्रवास अधिक यश लाभो आशा शुभेच्छा दिल्या
यावेळी निगडे ग्रामपंचायतीचे सरपंच भिकाजी भागवत,मा.उपसरपंच वि.सदस्य गणेश भांगरे,मा.सरपंच बळीराम भोईरकर,माजी उपसरपंच/सचिव कशाळ सोमनाथ उर्फ माऊली जाधव,मा.उपसरपंच तुकाराम जाधव,गोपाळ पवळे,रोशन पिंगळे, शामकांत पवार,यासह आदिजण उपस्थितीत होते



