मावळराजकीय

कल्हाट ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन

आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून २७ लक्ष निधी उपलब्ध

Spread the love

User Rating: Be the first one !

 

टाकवे बुद्रुक – मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून कल्हाट ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे भुमिपुजन नुकतेच संपन्न झाले

यामध्ये कल्हाट ग्रामपंचायत हद्दीतील दलितवस्ती समाजमंदिर बांधकाम १५ लक्ष निधी,जागृतीनगर अंतर्गत रस्ता करणे १२ लक्ष करणे या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे आमदार सुनील शेळके यांनी निवडणूक काळात दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती प्रत्येक गावात निधीच्या माध्यमातून करत आहेत

विधानसभा निवडणुकीत संपूर्ण गाव आमदार सुनील शेळके यांच्या मागे खंबीरपणे उभा होते गावाच्या विकासासाठी आमदार साहेब सदैव तत्पर असतात सदर दिलेल्या निधीबद्दल सरपंच शिवाजी करवंदे यांनी आभार मानत समाधान व्यक्त केले

आमदार सुनील शेळके यांचे प्रतिनिधी म्हणून युवा नेते जनसेवक देवाभाऊ गायकवाड विशेष उपस्थितीत होते यासह सरपंच शिवाजी करवंदे, उपसरपंच देविदास धनवे, सोमनाथ आगिवले बिभिषण पवळे, किसान सेल अध्यक्ष दिगंबर आगिवले, उद्योजक व्हा.चेअरमन रविंद्र पवार,मा.सरपंच गोपाळ पवळे, सुभाष पवार, संतोष पवार, भगवान पवार, शंकर कल्हाटकर,सागाजी पवार, संतोष पवळे,महिपत पवार शिवाजी पवार तानाजी पवार आदीजण उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button